महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ठाणे येथे ध्वजारोहण कार्यक्रमात सरपंच, ग्रामसेवक, पोलीस, विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले सोमवार, ०१ मे, २०१७
ठाणे : आज महाराष्ट्र दिनी साकेत मैदान येथे ध्वजारोहण समारोहानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरपंच, ग्रामसेवक, पोलीस, विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परम वीर सिंह, पोलीस अधीक्षक महेश पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती.

५ ग्रामपंचायतींचा सन्मान
स्मार्ट ग्राम योजनेत मुरबाडमधील कासगाव, अंबरनाथमधील खरड, भिवंडीमधील महाळूंगे, शहापूरमधील वेहलोंडे, कल्याणमधील नागाव अशा या ग्रामपंचायतींचे सरपंच सन्मानित करण्यात आले. यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ आदर्श गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायत चावरे मसरूंडी तालुका कल्याण यांना देण्यात आला.

प्रशासनातील कामगिरी
विशेष कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक मनोज चौधरी, शहापूरचे तलाठी विजय किसान लोहकरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनाही गौरविण्यात आले.

राष्ट्रपती पुरस्कार स्काउट
राष्ट्रपती पुरस्कार स्काऊट म्हणून रितेश कांबळे, शुभ वैती, अथर्व प्रभावळे, पुनंग घेडा तसेच राष्ट्रपती पुरस्कार गाईड म्हणून आकांक्षा पराते, हर्षदा शिरीष कांबळे, शोभा जलधरी, प्रेक्षा मेहता, प्रीती सैल, वेडावती ठिपसे यांना गौरविण्यात आले.

जिल्हा क्रीडा पुरस्कार
स्नेहल पवार (तलवारबाजी), गौरांग आंब्रे (मैदानी खेळ), बबन खरात (पॉवरलिफ्टिंग) यांना जिल्हा क्रीडा पूरस्कार देण्यात आला.

जिल्हा उद्योग पुरस्कार
जिल्हा उद्योग पुरस्कार शहापूर तालुक्यातील आटगाव मधील फार्मा एअर मोड्युलर सिस्टीमचे भैयासाहेब पाटील तसेच अंबरनाथमधील मेकोबर इंजीनिअरींग सिस्टिम्सचे मुरलीधर कामत यांना प्रदान करण्यात आले.

पोलीस पदके
उपमुख्य क्षेत्र रक्षक बिमल नथवाणी यांना नागरी संरक्षण दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पदक देण्यात आले. तसेच पोलीस महासंचालक यांचे ग्रामीण जिल्ह्यासाठीचे पदक अनिल जरग, रवींद्र खंडाळे, वैभव सावंत या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

याशिवाय पोलीस महासंचालक यांच्याहस्ते सन्मान चिन्ह मिळालेल्या पोलिसांची नावे पुढीलप्रमाणे :- पोलीस उपायुक्त पंढरीनाथ पवार, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी, राजकुमार कोथमिरे, देविदास घेवारे, मनोहर पाटील, विजय डोळस, धुळा टेळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल जगताप, प्रकाश सावंत, हवालदार राजू जोगी, अशोक जमधडे, विलास नलावडे, ज्योतिराम साळुखे, सुरेश राजे, वसंत शेडगे, ज्ञानदेव जाधव, प्रकाश शिरसाठ, दीपक जाधव, संतोष चौधरी, दीपक बैरागी, रवींद्र काटकर, भूपेंद्रसिंग राजपूत, प्रमोद चौधरी, संतोष शेडगे यांना देण्यात आला.

मनरेगा कामाचे आदेश वाटप
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजेतील मजुरांना कामाचे आदेश वाटपही करण्यात आले. किसान जाधव, नारायण विशे, बापू विशे, पुंडलिक विशे, दुधा गायकर, गानू देशमुख, गोविंद डोहाळे, कुसुम डोळे, दत्तात्रय तातू हे ते वैयक्तिक काभार्थी आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result