महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क गुरुवार, १८ एप्रिल, २०१९


हिंगोली :
हिंगोली लोकसभा-१५ मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियंका जयवंशी आणि अपर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वला मिणियार यांनी देखील हिंगोली येथील सिटी क्लब या सखी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी विविध मतदान केंद्रावर नव मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने मतदान केल्याचे चित्र होते.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतदानाची जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी, हिंगोली, जिल्हा परिषद शाळा, लिंबाळा, ता. हिंगोली, जिल्हा परिषद शाळा, संतुक पिंपरी, ता. हिंगोली, जिल्हा परिषद शाळा, डिग्रस कऱ्हाळे, ता. हिंगोली आदी मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result