महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास हाच ध्यास - पालकमंत्री बबनराव लोणीकर शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९जालना : गेल्या चार वर्षात मतदारसंघासह जिल्ह्याचा विविध विकास योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. येणाऱ्या काळातही मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हृयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

बाबई येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रामा-२३३ ते बाबई ते सरहद रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या ४ कोटी २२ लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

पालकमंत्री श्री. लोणीकर म्हणाले, गेल्या ७० वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील अनेक गावे रस्त्यांच्या विकासापासून वंचित होते. परंतु गेल्या चार वर्षाच्या काळात जिल्ह्यात विविध विकासकामे करण्याबरोबरच पक्क्या व मजबुत रस्त्यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात या गावासह मतदार संघातील प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द आहोत.

दळणवळणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रिपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपूर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्या तीन वर्षाच्या काळात २०० गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत. गावांना रस्ते व्हावेत, शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतूक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी, वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते श्रीधरजवळा ता. परतुर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३ कोटी ७ लक्ष, २२लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचा तसेच खोराडसांगवी ता. मंठा येथे 6 लक्ष रुपये किंमतीच्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result