महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागरी सेवा दिनानिमित्त डॉ महेंद्र कल्याणकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
ठाणे : नागरी सेवा दिनानिमित्त आज संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रशासनात विविध आघाड्यांवर केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात महसूल वाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला शासकीय सेवा देणे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज, पीक कर्जवाटपात केलेली लक्षणीय वाढ, जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून केलेली कामे, शासकीय जत्रेसारख्या उपक्रमातून एकाच ठिकाणी केलेले काही लाख दाखल्यांचे वाटप, राज्यातले जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले पहिले कौशल्य विकास केंद्र, सर्वाधिक पेसा गावांसाठी केलेले प्रयत्न याची दाखल घेऊन हा विशेष गौरव करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result