महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उड्डाणपुलासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मालमत्ताधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते इरादापत्राचे वाटप शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९


मावेजा वाटपासाठी ४ कोटी ८८ लक्ष रुपये प्राप्त

जालना :
परतूर येथील उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीचा मावेजा देण्यासाठी ९ कोटी ८ लक्ष रुपयांची आवश्यकता असुन त्यापैकी ४ कोटी ८८ लक्ष रुपये प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आलेल्या सर्व मालमत्ताधारकांना त्यांच्या जमीनीचा मोबदला देण्यासाठी आपण प्रतयनशिल असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. परतुर येथील उड्डाणपुलासाठी संपादित केलेल्या जमीनीच्या मालमत्ताधारकांना इरादापत्राचे वाटप पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार भाऊसाहेब कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोलनकर, शाखा अभियंता व्ही.जी. वाघमारे, उपअभियंता एस.व्ही. ठोंबरे, ओम भोर, प्रकाश दिक्षित, नारायण सुरुंग, श्री काटे यांच्यासह मालमत्ताधारक उपस्थित होते.

परतुर येथील उड्डाणपुलासाठी १०७ मालमत्ताधारकांची जमीन संपादित करण्यात आली होती. या मालमत्ताधारकांना त्यांच्या जमिनीचा मावेजा उपलब्ध करुन देण्यासाठी निधीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असुन सर्व मालमत्ता धारकांच्या मावेजापोटी ९ कोटी ८ लक्ष रुपयांच्या निधीची आवश्यकता असुन त्यापैकी ४ कोटी ८८ लक्ष रुपये प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. 107 मालमत्ता धारकांपैकी 13 मालमत्ता धारकांना आज इरादापत्रांचे वाटप करण्यात आले असुन उर्वरित मालमत्ताधारकांना लवकरच या इरादापत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result