महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण मंगळवार, ०१ मे, २०१८
नाशिक : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली आणि नंतर श्री. माने यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, प्रविण पुरी, सुखदेव बनकर, तहसीलदार श्रीमती एस. डी. मोहिते, मंजूषा घाडगे, बबन काकडे तसेच शिक्षण, कृषि, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, भूजल सर्वेक्षण आदि विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result