महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जागतिक महिला दिनानिमित्त सायकल रॅली बुधवार, ०८ मार्च, २०१७
महापौरांची उपस्थिती; महिला सक्षम असल्याचा दिला संदेश

ठाणे :
जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या सायकल रॅलीत महिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. दोन दिवसांपूर्वीच महापौरपदी विराजमान झालेल्या मीनाक्षी शिंदे या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

डोक्याला हेल्मेट, बूट, टी-शर्टस अशा पेहरावात सुमारे पन्नास महिलांनी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सहभाग घेतला. महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देत ही रॅली पार पडली.

महापौर श्रीमती शिंदे म्हणाल्या की, नुकतीच मी या शहराची महापौर झाले आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त या रॅलीत सहभागी होण्याची संधी मला मिळाली आहे याचा आनंद होतोय. महिला सक्षम आहेत आणि कुठलेही काम करण्यात मागे नाहीत हा संदेश या रॅलीतून जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम, तहसीलदार समीर घारे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातून तलावपाळी येथे फिरून परत जिल्हाधिकारी कार्यालयात विसर्जित झाली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result