महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू ; कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक ३ फेब्रुवारीस गुरुवार, ०५ जानेवारी, २०१७
ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील पदासाठीची निवडणूक ३ फेब्रुवारी २०१७ रोजी होत आहे. भारत निवडणूक आयोगाने काल रात्री याची घोषणा केली. निवडणूक जाहीर झाल्याने कोकण विभागात ९ फेब्रुवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

या निवडणुकीची सूचना १० जानेवारीस प्रसिद्ध करण्यात येईल तर १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ जानेवारीस उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि २० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ फेब्रुवारीस सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होऊन ६ फेब्रुवारीस मतमोजणी होईल, असे भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result