महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अकोला लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान बुधवार, १७ एप्रिल, २०१९

18 लाख 64 हजार 544 मतदार

पथकांच्या वाहनांचे जीपीएस ट्रॅकींग

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघासाठी गुरूवारदि. 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदान पथक मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. लोकसभा मतदारसंघात 18 लाख 64 हजार 544 मतदार असून ही निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान पथकांची वाहने जीपीएस ट्रॅकींग करण्यात आली आहे.

सात सखीपाच आदर्शएक दिव्‍यांगाचे मतदान केंद्र

अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन हजार 85 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय १७८ झोनल ऑफीसर नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्‍टीकोनातून संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रावरुन वेबकॉस्टीग करण्‍यात येणार आहे. मतदारसंघात महिलांकडून संचालित होणारे सात सखी मतदान केंद्रपाच आदर्श मतदान केंद्रएक दिव्यांगाद्वारा संचालित मतदान केंद्र राहणार आहे.

मतदान पथकांसाठी वाहतूक व्यवस्था

आज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मुख्यालयावरुन नियोजित मतदान केंद्रावर पथके रवाना झालीत. मतदान पथकांसाठी परिवहन व्यवस्थेकरीता एसटी महामंडळाच्या २०३ बस आणि ३९ मिनी बस आहेत. त्‍याचप्रमाणे ४१६ जीप गाड्या व ईव्हीएम वाहतुकीसाठी १५ ट्रक राहणार आहे. मतदारसंघात आलेल्या सर्व दोन हजार 85 मतदारन केंद्रांवर बॅलेट युनिटकंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन पुरविण्यात आल्या आहे. तसेच ४९८ बॅलेट युनिट४९७ कंट्रोल युनिट आणि ६८३ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

११ पुराव्‍याला मान्‍यता

निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रा व्यतीरिक्त मतदानाची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डपासपोर्टवाहन चालक परवानाछायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्रराज्‍य शासनसार्वजनिक उपक्रमसार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुकपॅन कार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्डमनरेगा कार्यपत्रिकाकामगार मंत्रालयातर्फे दिले गेलेले आरोग्‍य विमा स्मार्ट कार्डछायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेजखासदारआमदारविधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र या ११ पुराव्याला मान्यता दिली आहे. या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदाराची ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे

१९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित   

निवडणूक विषयक माहिती मिळविण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्‍यात आला आहे. आतापर्यंत एक हजार ९९१ नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधला आहे. नागरिकांना १९५० वर टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्यात अडचण येऊ नयेयासाठी १० हन्‍टींग लाईन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

मतदानासाठी सुट्टीअंशत: सवलत

प्रत्‍येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी शासनाने मतदानाचे दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या कामगारअधिकारीकर्मचारी यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अपवादात्मक परिस्थीतीत कामगारअधिकारीकर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

दिव्यांगांसाठी सोयी-सुविधा

दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावायासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्राचे ठिकाणीमतदानकेंद्राच्या इमारतीमध्ये व्हीलचेअर उपलब्ध  करुन देण्यात आली आहे. मतदानकेंद्राच्या ठिकाणी दोन स्वयंसेवक ठेवण्यात आले आहेत. ते दिव्‍यांग मतदारांना मतदान कक्षात पोहोचण्यासाठी सहकार्य करतील. अकोला ऑटो युनियनने दिव्यांग मतदारांना त्यांचे घरापासून मतदान केंद्रापर्यंत नि:शुल्क        ने-आण करणार आहे. तसेच प्रत्येक मतदानकेंद्राच्या ठिकाणी उन्हापासून संरक्षणाचे दृष्टीने शेड उभारण्यात आले आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि इतर मुलभुत सोयी-सुविधा देखील उपलब्‍ध करुन देण्यात आल्या आहे. मतदान केंद्रावर मेडीकल किटची व्यवस्था करण्यात आली आहे.

212 मतदान केंद्रांवर वेबकॉस्टींग

जिल्ह्यातील ३९८ शस्त्र परवाना धारकांना त्‍यांचेकडील शस्त्र पोलिस ठाण्यात जमा केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे अनुषंगाने पोलिस प्रशासनाने पोलिस बल तैनात केले आहे. संवेदनशील मतदानकेंद्राच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  २१२ मतदान केंद्रांवर वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे.

सी-व्हीजील ॲपवर 34 तक्रारी

मतदानादरम्यान नागरीकांना कोणतीही आक्षेपार्ह बाब निदर्शनास आल्यास त्यासाठी C-VIGIL अॅप द्वारे त्याबाबतची तक्रार करण्यात येणार आहे. या अॅपवर 34 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे निरसन करण्यात आले आहे. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result