महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिवभोजन केंद्राचे पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ रविवार, २६ जानेवारी, २०२०


गोंदिया :
गरीब आणि गरजू लोकांना 10 रुपयात भोजन देणाऱ्या शिवभोजन केंद्राचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते जयस्तंभ चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रताप क्लब कॅन्टीन येथे करण्यात आला. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार राजेश भांडारकर, अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, प्रताप क्लब कॅन्टीनचे संचालक केशव पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देशमुख यांनी गरीब व्यक्तीला शिवभोजन थाली वाटून या योजनेचा शुभारंभ केला. प्रताप क्लब कॅन्टीन परिसरात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयात कामानिमीत्त येणाऱ्या गरीब व गरजू लोकांना या कॅन्टीनमधून शिवभोजनाचा 10 रुपये देवून आस्वाद घेता येणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result