महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहिर गुरुवार, ०५ जानेवारी, २०१७
नवी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील विधान परिषद सदस्य रामनाथ मोते यांचा कार्यकाल 5 डिसेंबर 2016 रोजी संपला असून भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील पत्र क्र.ECI/PN/2/2017 दि.4 जानेवारी 2017 रोजीच्या प्रेस नोटनुसार सदर रिक्त जागा भरण्यासाठी द्विवार्षिक निवडणूक घेण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्दीचा दिनांक 10 जानेवारी 2017 (मंगळवार), नामनिर्देशन सादर करण्याचा अखेरचा दिनांक 17 जानेवारी 2017 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 जानेवारी 2017 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 20 जानेवारी 2017 (शुक्रवार), मतदानाचा दिनांक 3 फेब्रुवारी 2017 (शुक्रवार), मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक 6 फेब्रुवारी 2017 (सोमवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 9 फेब्रुवारी 2017 (गुरुवार) असा आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, पहिला मजला, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई दूरध्वनी क्र.022-27571501 हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तसेच उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील 5 जिल्ह्यामध्ये 4 जानेवारी 2017 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. याची सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींनी आणि सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. या कोकण विभाग मतदार संघामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्यात येत असून 23 नोव्हेंबर 2016 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदार यादीनुसार कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ठाणे-15736, पालघर-5115, रायगड-10009, रत्नागिरी-4328, सिंधुदूर्ग-2456 असे एकूण 37644 मतदार आहे. भारत निवडणूक आयोगाकडील कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 7 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील 5 जिल्ह्यांमध्ये एकूण 98 मतदान केंद्र प्रस्तावित असून यामध्ये ठाणे-21, पालघर-13, रायगड-28, रत्नागिरी-17 तर सिंधुदूर्ग-19 असे आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग मतदार संघ तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result