महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘महामानव’संग्राह्य पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०१७
नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘महामानव’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. हे पुस्तक कोंकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघर या जिल्हा माहिती कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या पुस्तकाची किंमत रु. 50/- एवढी असून पृष्ठ संख्या 200 आहे. या पुस्तकात मान्यवर लेखक, संशोधक, प्राध्यापक, संपादक, पत्रकार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी पैलूंवर लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. विद्यार्थी व नागरिक यांना अभ्यासासाठी आणि संदर्भासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result