महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दीनदयाळ नागरी सहकारी बँक शाखेचे उद्घाटन शुक्रवार, २१ जुलै, २०१७
बीड : दीनदयाळ नागरी सहकारी बँक बीड शाखेचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, वेदशास्त्री संत धुंडीराज शास्त्री महाराज पाटंगणकर, बँकेच्या अध्यक्षा शरयु शरदराव हेबाळकर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोपले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींची उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, दीनदयाळ नागरी सहकारी बँक मर्या. अंबाजोगाई या बॅंकेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचे काम होत आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा अशी बँकेची धारणा असून त्या माध्यमातून सामान्य माणसाची बँक सेवा करत आहे. बँक आपले काम शिस्तबद्ध पद्धतीत करत असून ग्राहकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन देत आहे.

आज देशात, जगात प्रगतीशील तंत्रज्ञाचा वापर होत असून या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेत वापर करुन ग्राहकांना अनेक चांगल्या सुविधा देण्याचे काम होत आहे. या बँकेत ठेवी ठेवण्याबरोबर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी बँकेचे कर्ज वेळेत परत करणे आवश्यक आहे. कर्जाची वेळेवर देवाणघेवाण केल्यास अशा बँकाचा विकास होण्यास मदत होईल. याचा फायदा सामान्यांना व खऱ्या गरजूंना होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी दादाजी पवार, धुंडीराज शास्त्री महाराज पाटंगणकर, श्री. क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. श्रीमती हेबाळकर यांनी प्रास्ताविकात बँकेत करत असलेल्या विविध उपक्रम, ग्राहकांसाठी विविध सोईसुविधाची माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result