महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवार, १२ एप्रिल, २०१८
35 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन

वर्धा :
उत्तम रस्ते हे प्रगतीचे व विकासाचे राजमार्ग ठरतात. विदर्भाचा सर्व बाबींमध्ये असलेला अनुशेष दूर करण्यासाठी सर्व शक्तीनिशी काम करीत असून वर्धा जिल्ह्याचा समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शिवाजी चौक ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण आणि सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आज कारला चौक येथे पालकमंत्री यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पंकज भोयर, पिपरी मेघेचे सरपंच अजय गौळकार आदी उपस्थित होते.

हा रस्ता तयार करण्यासंदर्भात नगर परिषद निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द आज पूर्ण करीत असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी आमदार पंकज भोयर यांनी पाठपुरावा केला. विशेष बाब म्हणून या रस्त्यांसाठी 35 कोटी रुपये मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याचे काम सोपवले आहे. सर्व कामे पूर्ण करण्याची इच्छा असूनही काही मर्यादांमुळे ते होऊ शकत नाहीत. ते पूर्ण करण्यासाठी जनतेच्या आशीर्वाद रुपी शक्तीची गरज असून ती शक्ती अशीच पाठीशी असू द्या असेही श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले. जिल्ह्यात महात्मा गांधी शिक्षण विद्यापीठ स्थापन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result