महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बिंदुसरा नदीच्या पुलाची पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पाहणी शनिवार, ०२ सप्टेंबर, २०१७
बीड : बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील जुना पूल व वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तसेच पर्यायी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता नुकत्याच झालेल्या पावसाने वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पर्याची उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी बिंदूसरा नदीवरील नादुरुस्त पुलाची व तात्पुरत्या वळण रस्त्याची तसेच इतर पर्यायी रस्त्याची भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आमदार आर.टी. देशमुख, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्राजेक्ट डायरेक्टर वाय. एन. घोटकर, आय आर बीचे श्रीवास्तव उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने पुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी तयार करण्यात आलेल्या तात्पुरता वळण रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्यात आली होती. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने वळण रस्ताही वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बिंदूसरा नदीवरील नादुरुस्त पुलाची व तात्पुरत्या वळण रस्त्याची तसेच सध्या या महामार्गावरील वाहतूक उस्मानाबादकडून येणारी जड अवजड वाहने वाहतूक मांजरसुंबा-पाटोदा-बीड मार्गे तसेच औरंगाबाद कडून येणारी जड अवजड वाहने गेवराई तालुक्यातील गढी येथुन वळविण्यात आली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही सर्व माहिती जाणून घेवून वाहतुकीच्या पर्यायी उपाय योजनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य त्या सूचना केल्या. तसेच बिंदुसरा नदीवरील नवीन पुलाचे काम पावसाळा कमी झाल्यानंतर तात्काळ हाती घेऊन पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आय आर बीच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हा प्रशासनाने या कामी वेळोवेळी पाठपुरावा करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बीड शहरातील नागरिकासह या मार्गावरुन होत असलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी बिंदुसरा नदीवर वेगवेगळ्या ठिकाणी पुल उभारण्यात अले असून त्याचा उपयोग वाहतुकीसाठी करण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शहरातील दगडी पुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील पुल, जुना मोढा येथील पुल तसेच मिनी बायपास मार्गाची पाहणी करुन या पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु करावी अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. यावेळी पदाधिकारी अधिकारी नागरिक मोठ्यासंख्येन उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result