महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेतले महालक्ष्मीचे सपत्नीक दर्शन शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९


कोल्हापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे सपत्नीक दर्शन घेतले.

यावेळी राज्यपालांच्या पत्नी विनोधा राव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, तहसीलदार सचिन गिरी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि विनोधा राव यांनी मातृलिंगाचेही दर्शन घेतले. यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result