महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण बुधवार, ०१ मे, २०१९


लातूर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्त एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी (सा.) सुनील यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो ) प्रदीप कुलकर्णी यांच्यासह इतर शासकीय विभागप्रमुख व अधिनस्त अधिकारी , कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी महाराष्ट्र राज्याच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांना शुभेच्छा दिल्या. तर देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या सर्व कामगारांना ही कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या समवेत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर परेडचे संचलन झाले पथ संचलनात एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांडर, आठ पॅलटून व २३० जवानांनी सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवरांची भेट घेऊन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गायन झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवाद तज्ञ उध्दव फड यांनी केले.

विविध पुरस्काराचे वितरण :-
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते महसूल, पोलीस व क्रीडा विभागांच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महसूल :- १) नागनाथ गोविंदराव खंदाडे- आदर्श तलाठी पुरस्कार
क्रीडा :- १) शेख मोसीन मोबीन अहमद- गुणवंत खेळाडू ( तलवारबाजी )
२) संतोष श्रीकृष्ण कदम- गुणवंत क्रीडा संघ एक ( क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य )

पोलीस :-
१)गुलाम महेबुब हैदर गलेकाटु, सहा पोउपनि पो. मु. लातूर – पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २) एस आर जाधव पोलीस फोटोग्राफर - सुवर्णपदक, ३) बॉम्ब शोधक व नाशक पथक चे श्वान राणा आणि हॅन्डलर पोना ए.व्ही. केंद्रे व एल. ढी. कुमरे - रौप्य पदक , ४) अलिमोदीन मोईनोदीन शेख -पोलीस पदक, ५ ) विठ्ठल बाबुराव भांडुळे- पोलीस पदक , ६) संग्राम वसंतराव पाटील- पोलीस पदक,७) सुनील दशरथ कावळे- पोलीस पदक
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result