महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
भाईंदर रेल्वे भुयारी मार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न शुक्रवार, २० ऑक्टोंबर, २०१७
ठाणे : भाईंदरवासियांना दिवाळी – पाडव्यानिमित्त भाईंदर रेल्वे स्टेशनच्या पादचारी भुयारी मार्गाचे उद्घाटन आणि मीरारोड रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन करुन अनोखी भेट आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, महापौर डिंपल मेहता, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, आयुक्त नरेश गीते, उपमहापौर चंद्रकांत वैती आदी उपस्थित होते.

भाईंदर रेल्वेच्या पश्चिम – पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात. त्यांना जाण्या - येण्यासाठी उड्डाण पुलाचा वापर करावा लागत होता. या पादचारी पुलामुळे पूर्व -पश्चिम येणे- जाणे अधिक सोपे होणार आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मिरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. या पुलाचे नामकरण शहीद भगत सिंग पूल असे केले आहे. महानगर पालिकेने अल्पावधीत उभारलेल्या पुलामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे ही त्यांनी शेवटी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result