महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे विनम्र अभिवादन शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७
सांगली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी एस. टी. स्टँड समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, दक्षता समितीचे सदस्य सुरेश दुधगावकर, दलितमित्र अशोक पवार, डॉ. प्रताप मधाळे, सुधाकर कांबळे, मधुकर पद्माळकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच ध्वजवंदन करण्यात आले. तसेच श्री. चेतन कांबळे यांच्या कथा एका महामानवाची या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result