महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ठाणे जिल्हा परिषदेसाठी निवडणूक सुचना जाहीर : २८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारणार गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७
  • जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरु
ठाणे : ठाणे जिल्हा परिषद व ५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची सविस्तर घोषणा करण्यात आली असून २८ नोव्हेंबर २०१७ पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. निवडणूक सूचना जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालये, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालये तसेच चावडी व मतदार गणांच्या गावांमध्ये लावण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी कळविले आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे या निवडणुकीची तयारी सुरु असून सर्व संबंधित विभाग यांच्या बैठका सुरु आहेत. नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी देखील बैठक घेऊन योग्य रितीने समन्वयन करण्याचे निर्देश दिले. वाहने, अधिकारी व कर्मचारी यांचे अधिग्रहण, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांना प्रशिक्षण याचे नियोजन करण्यात आले असून विविध समित्या कामाला लागल्या आहेत.

सादर झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून होईल. उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि छाननी खालील ठिकाणी होईल. वन प्रशिक्षण सभागृहाचे उत्तर व दक्षिण बाजूकडील दालन, शहापूर; तहसीलदार कार्यालय, मुरबाड; विधानसभा मतदार संघ १३८ चे मध्यवर्ती कार्यालय, मोहन प्राईड सांस्कृतिक कल्याण केंद्र, पोद्दार शाळेच्या बाजूला, कल्याण पश्चिम; भिवंडी निजामपूर शहर पालिकेचे वऱ्हाळदेवीमाता मंगल भवन, कामतघर, भिवंडी; उपविभागीय अधिकारी कार्यालय, एसटी स्थानकासमोर, भिवंडी, नवीन प्रशासकीय भवन, तहसीलदार कार्यालय, अंबरनाथ यांचे दालन १३ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान आणि १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result