महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची शहीदांच्या कुटुंबि‍यांना सांत्वनपर भेट मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९


बुलडाणा :
राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जम्मू काश्मीर राज्यातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले गोवर्धन नगर ता.लोणार येथील शहीद जवान नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

सर्वप्रथम त्यांनी शहीद नितीन शिवाजी राठोड यांना अभि‍वादन करुन श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी शहीद नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपुस केली. तसेच शहीद नितीन राठोड यांचा लहान भाऊ व वडील शिवाजी राठोड यांच्याशी चर्चा करत विशेष बाब शासनाच्या वतीने लवकरात लवकर सर्वतोपरी सहकार्य केल्या जाईल, असेही यावेळी सांगितले. याप्रसंगी राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, शहीद नितीन शिवाजी राठोड यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली याचा मला सार्थ अभि‍मान आहे. शहीद जवान नितीन राठोड यांनी आपल्या जिल्ह्याचे नावलौकीक केले आहे. या गोष्टीची प्रेरणा समाजातील सर्वांनी घ्यावा. भेटी दरम्यान त्यांच्या समवेत आमदार डॉ.शशि‍कांत खेडेकर,जि.प.सदस्य राजु इंगळे,सरपंच संजय चव्हाण, तहसीलदार सुरेश कव्हळे, तसेच इतर राजकीय पदाधिकारी व मान्यवर उपस्थ‍ि‍त होते.
शहीद जवान संजय राजपूत यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत यांच्या निवासस्थानी राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी शहीद संजय राजपूत यांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना राज्य शासनाकडून पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष हरीश रावळ, उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result