महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बीड जिल्ह्यात 75 हजार 909 शेतकऱ्यांना 334 कोटी 47 लाखाची कर्जमाफी बुधवार, १३ डिसेंबर, २०१७
शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी

बीड :
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यात 75 हजार 909 शेतकऱ्यांना 334 कोटी 47 लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे हे सर्व शेतकरी राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्याने समाधानी असल्याचे दिसून येत आहे.

प्रातिनिधिक स्वरुपात परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव, सेलू (स), सफराबाद येथील शेतकऱ्यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मंचक रघुनाथ साबळे :-
श्री. साबळे हे परळी तालुक्यातील सेलू (स) या गावचे रहिवाशी असून त्यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले 7 हजारांचे कर्ज तर त्यांच्या वडिलांच्या नावाने असलेले 30 हजाराचे शेती कर्ज या कर्जमाफी योजनेंतर्गत माफ झाले असून एकूण 37 हजाराच्या कर्जाची माफी त्यांच्या कुटुंबाना मिळाली आहे. यामुळे त्यांनी समाधान व्यक्त करुन शासनाला धन्यवाद दिले आहेत.

अंगद वामनराव जाधवर:-
सेलू (स) येथील शेतकरी श्री. जाधवर यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून घेतलेले 18 हजाराचे मुळ कर्ज व्याजाच्या रक्कमेसह एकूण 40 हजार झालेले होते. ही सर्व कर्जाची रक्कम कर्जमाफी योजनेंतर्गत माफ झाल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

श्रीमती विजयमाला प्रकाश राडकर :-
गाढे पिंपळगाव ता. परळी येथील महिला शेतकरी श्रीमती राडकर यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून घेतलेले 40 हजाराचे कर्ज व्याजासह 77 हजार झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 77 हजाराच्या कर्जाला माफी मिळाल्याने श्रीमती राडकर यांनी समाधान व्यक्त करुन शासनाचे आभार मानले.

अशाच बोलक्या प्रतिक्रिया गाढे पिंपळगावचे शेतकरी ज्ञानोबा रावण सोनवणे (38 हजाराची कर्जमाफी ) व सफदराबादचे दत्तात्रय दगडोबा तिडके (40 हजाराची कर्जमाफी ) यांनी दिलेल्या आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result