महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न बुधवार, ०१ मे, २०१९


उस्मानाबाद : येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री.अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी त्यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी,पत्रकार आणि नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास माजी आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजा राम सामी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) संतोष राऊत आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result