महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह इमारतीचे बांधकाम डिसेंबर अखेर पूर्ण होणार - पालकमंत्री मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९


अहमदनगर :
सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍या वतीने अहमदनगर जिल्‍ह्यातील कर्जत येथे शंभर विद्यार्थींनी क्षमता असलेले मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह इमारतीचे बांधकाम डिसेंबरअखेर पूर्ण करण्‍यात येणार असल्‍याचे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्‍या हस्‍ते कर्जत येथे मागासवर्गीय मुलींच्‍या वसतीगृहाचे भूमिपूजन करण्‍यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार दिलीप गांधी, कर्जत नगर परिषदेचे नगराध्‍यक्षा श्रीमती प्रतिभा भैलुमे, उपनगराध्‍यक्ष नामदेव राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, समाज कल्‍याचे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे तसेच कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक- नगरसेविका आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्‍हणाले, कर्जत येथे शिक्षण चांगल्‍या दर्जाचे व कमी खर्चात मिळत असल्‍यामुळे कर्जतला विद्येचे माहेरघर म्‍हटले जाते. सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍या वतीने शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्‍या मागासवर्गीय मुलींचे दोन मजली इमारतीस शासनाने ९ कोटी ३१ लाख ६१ हजार रुपये निधी मंजूर केले आहे. या इमारतीमध्‍ये पहिल्‍या मजल्‍यावर डायनिंग हॉल, किचन रुमसह १२ हॉल व दुसऱ्या मजल्‍यावर वाचनालय, व्‍यायाम रुमसह १४ हॉल मुलीकरिता बांधण्‍यात येणार आहे. वसतीगृहाचे काम लवकरच सुरु होऊन माहे डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

तसेच अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेला डिंभे- एडगाव पाणी प्रश्‍न सोडविण्‍यात आला असून कर्जत येथे प्रशासकीय इमारतीस २१७ कोटीच्‍या निधीस मान्‍यता देण्‍यात आली आहे. जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत करण्‍या आलेल्‍या कामामुळे कर्जतला पाणी उपलब्‍ध झालेले आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्‍यामुळे कर्जतकरांना दुष्‍काळास सामारे जावे लागत आहे. छावण्‍याचा प्रश्‍न लवकर मार्गी लागेल असेही त्‍यांनी यावेळी प्रा. शिंदे सांगितले.

यावेळी खासदार श्री. गांधी, कार्यकारी अभियंता श्री.राऊत, नगराध्‍यक्षा श्रीमती प्रतिभाताई भैलुमे, उपनराध्‍यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर यांनीही आपले मनोगत यावेळी व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक समाज कल्‍याणचे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result