महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विक्रीकर कार्यालयाचे नाव आता वस्तू व सेवाकर कार्यालय शनिवार, ०१ जुलै, २०१७
ठाणे : आजपासून देशात सर्वत्र जीएसटी करप्रणाली लागू झाली असून यापुढे विक्रीकर कार्यालयाचे नाव देखील बदलून ‘वस्तू व सेवाकर कार्यालय’ असे बदलण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विक्रीकर कार्यालयात आज सकाळी एक कार्यक्रम घेण्यात येऊन यावेळी नवीन नामफलक लावण्यात आला.

ठाण्याच्या कार्यालयाने ४५ कार्यशाळांच्या माध्यमातून लहान मोठे व्यापारी आणि व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला असून या करप्रणालीची माहिती दिली आहे.

ज्या करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना वस्तू व सेवाकर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासनमान्य ई सेवा केंद्रातून मदत घेऊन व ऑनलाईन करता येऊ शकेल. या नव्या कायद्याखाली सुरूवातीचे दोन महिने GSTR 3 B या नमुन्यात विवरण पत्र तयार करण्यासाठीची युटीलिटी वस्तू व सेवाकर विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result