महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या दूरध्वनी निर्देशिकेचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन गुरुवार, ०१ मार्च, २०१८
नवी मुंबई : कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या दूरध्वनी निर्देशिकेचे प्रकाशन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आले. यावेळी कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे उपस्थित होते.

यावेळी डॉ.पाटील म्हणाले कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या दूरध्वनी निर्देशिकेमुळे कोकण महसूल विभागातील सर्व कार्यालयांशी व अधिकाऱ्यांशी संपर्क करणे नागरिकांना सहज सोपे होणार आहे. ही दूरध्वनीसूची संग्राह्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण महसूल विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यालयांशी आणि विभागीय महसूल कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथील कार्यालयाशी सर्वसामान्य नागरिकांचा दररोजचा संबंध येतो. कोकण भवन मधील विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे तसेच अधिनस्त जिल्हा कार्यालयातील अधिकाऱ्यांचे महत्वाचे दूरध्वनी क्रमांक एकत्रित ठिकाणी सुलभ संदर्भासाठी या निर्देशिकेत देण्यात आले आहेत. कोकण विभागातील शासनमान्य यादीवरील दैनिकांच्या कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक या निर्देशिकेत देण्यात आले आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result