महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा बुधवार, २५ जानेवारी, २०१७
गोवा : निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे तसेच त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय मतदान दिवसाचे आयोजन केले जाते. पणजी, गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयातही राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त शपथ घेण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी परिचय केंद्राचे कार्यालय असलेल्या परिसरातील नागरिकांनी मतदानाविषयीची शपथ घेतली. तसेच यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी मतदारांना शपथ दिली. त्यांनी मतदार प्रक्रियेचे महत्त्व, लोकशाहीसाठी मतदानात भाग घेण्याविषयीची गरज याविषयी मार्गदर्शनही केले. गोवा राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने त्यासाठी या परिसरातील बीएलओ विनोद परब यांनीही मतदारांना मतदान प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result