महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून पाहणी शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७
सांगली : विजयनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची पाहणी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि कार्यकारी अभियंता डी.एस.जाधव यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांना इमारतीमधील विविध विभागांचे बांधकाम, नियोजन समिती सभागृह, अभिलेख कक्ष, जिल्हाधिकारी यांचा कक्ष यासह अन्य बांधकामाची माहिती दिली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result