महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चला मतदान करु....लोकशाही बळकट करु.... गुरुवार, ११ एप्रिल, २०१९


माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन

सोलापूर :
चला मतदान करु....लोकशाही बळकट करु असा संदेश देणाऱ्या चित्ररथाचे आज विभागीय आयुक्त तथा स्वीप निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्युरोच्या वतीने मतदार जनजागृती साठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथावर कलापथकांच्या मार्फत मतदान जागृती कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये कमी मतदान झालेल्या ठिकाणांवरती विशेषत: या प्रचाररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रारंभी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, महापालिका उपायुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त संजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सतीश घोडके आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result