महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गडचिरोली येथील स्‍टेडीयमचा विकास करणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवार, ०७ जानेवारी, २०१९


सीएम चषक स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्‍न

गडचिरोली :
'सीएम चषक' स्‍पर्धा हा युवकांमधील सुप्‍त कला व क्रीडा गुणांना चालना देणारा उपक्रम आहे. स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून माणूस घडतो. फक्‍त स्‍पर्धा निकोप असावी, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गडचिरोली येथील क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण व नुतनीकरण करत विकास करण्‍याची जबाबदारी अर्थमंत्री म्‍हणून आपण घेत असल्‍याची घोषणा त्‍यांनी यावेळी बोलताना केली.

६ जानेवारीला गडचिरोली येथे सीएम चषक स्‍पर्धेच्‍या पारितोषिक वितरण सोहळ्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्‍णा गजबे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. योगिता भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. योगिता पिपरे आदींची उपस्थिती होती.
अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्‍ह्यातील युवक एकलव्‍यासारखे आहे. प्रचंड जिद्द व आत्‍मविश्‍वासाच्‍या बळावर यश कवेत घेण्‍याची शक्‍ती त्‍यांच्‍यात आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्‍या विकासासाठी आपण प्रयत्‍नशिल असून ९० कोटी रू. निधी आपण मंजुर केला आहे. गडचिरोली-वडसा रेल्‍वे मार्गा संदर्भात वनविभागाच्‍या जागेचा प्रश्‍न आपण सोडविला आहे. गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी ३५ कोटी रूपयांचा निधी आपण दिला असून जिल्‍हा वार्षिक योजनेंतर्गत सुध्‍दा विशेष बाब म्‍हणून ४४ कोटी रूपयांचा विकास निधी आपण उपलब्‍ध केला आहे.

यावेळी बोलतांना खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्‍ध केल्‍याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. सीएम चषक स्‍पर्धांमधील विजेत्‍यांना यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषिकांचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे संचालन सीएम चषक संयोजक अनिल तिडके यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result