महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यास प्राधान्य- एकनाथ शिंदे सोमवार, ०४ मार्च, २०१९


मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यास प्रधान्य- पालकमंत्री

सेवा रुग्णालयाचे आरोग्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर
: सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सेवा रुग्णालय हे खाजगी रुग्णालयापेक्षाही अतिशय चांगली व दर्जेदार सेवा देणारे रुग्णालय असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नवीन बांधण्यात आलेल्या सेवा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त अभियान संचालक (NUHM) डॉ. सतीश पवार, उपसंचालक (आरोग्य) डॉ. पी.पी. धारुरकर हे उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, परमेश्वरानंतरचे स्थान हे डॉक्टरांचे असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना चांगली सेवा दिली पाहिजे. सरकार सर्वसामान्य माणसाला आरोग्याची सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न आहेत. आरोग्य विभाग दुर्गम भागात अतिशय चांगल्या सेवा देत असून आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न आहे. सेवा रुग्णालय 50 बेडचे असून हे रुग्णालय खाजगी रुग्णालयापेक्षाही चांगले सेवा देणारे आहे. सेवा रुग्णालयाची इमारत ही अतिशय सुंदर व देखणी असून येथील स्वच्छता पाहून रुग्णांचा आजार निम्मा बरा होत असेल, अशा शब्दात सेवा रुग्णालयाचे कौतुक केले.मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यास प्राधान्य- महसूलमंत्री

श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत 110 कोटी रुपये रुग्णांवर खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 110 लहान मुलांचे ह्दयाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. सरकारी दवाखाना असणारे हे सेवा रुग्णालय अतिशय चांगली स्वच्छता असणारे रुग्णालय आहे. हे एवढे सुंदर कसे ठेवतात याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्याकडून घ्यावी लागेल, असे म्हणून त्यांनी रुग्णालयास प्रशिस्तीपत्र दिले.

सेवा रुग्णालयात सध्या दोन मजले तयार असून लिफ्ट नसल्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. लिफ्ट तत्काळ बसविण्यात येईल व लिफ्टसाठी येणारा खर्च हा सीएसआर फंडातून देण्यात येईल. तसेच सोनोग्राफी मशिनसाठी सीएसआर फंडातून व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी घोषित केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. हर्षदा वेदक, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता धनंजय भोसले, शाखा अभियंता ए.बी. पोळ आदींसह रुग्णालयाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सेवा दिलेल्या सर्व निवृत्त वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result