महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय ध्वजारोहण विधानसभा सदस्य उन्मेश पाटील यांच्या हस्ते संपन्न बुधवार, ०१ मे, २०१९


चाळीसगाव  :
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी ८ वाजता येथील पोलीस परेड मैदानावर चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे विधानसभा सदस्य उन्मेश पाटील यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी पंचायत समितीच्या उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार अमोल मोरे, सभापती स्मीतल बोरसे, सदस्य सुनील पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर विधानसभा सदस्य उन्मेश पाटील यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result