महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील – सामाजिक न्याय मंत्री रविवार, ३० जुलै, २०१७
वर्धा : गरीब, दुर्बल व शोषित एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून प्रत्येक तालुक्यात दोन निवासी शाळा उभारण्यात येत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज हैबतपूर येथील मागासवर्गीय निवासी शाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी कार्यक्रमाला नागपूर विभागाचे समाज कल्याण उपआयुक्त माधव झोड, जाती पडताळणी समितीचे उप आयुक्त सुरेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, जाती पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे उपस्थित होते.

श्री. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशातील गोरगरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे स्वप्न होते. राज्य सरकार ते पूर्ण करीत आहे. शासनाने मागासवर्गीयासाठी विविध योजना सुरु केल्या आहे. पुढील दोन वर्षात रमाई योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर बांधून देण्यात येणार आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्यांच्या विकासाबरोबर पाणी व स्वच्छता यावर भर दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही किंवा प्रलंबित असेल अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ देण्याच्या सूचनाही यावेळी समाज कल्याण आयुक्तांना केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव झोड यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result