महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्र्यांनी केली कृषि सौर पंप लाभार्थ्यांची नोंदणी गुरुवार, २४ जानेवारी, २०१९


भंडारा :
ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांना स्वस्त व नियमित सौर ऊर्जा मिळण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना आणली असून या योजनेंतर्गत आज तुमसर येथे कृषि सौर पंप लाभार्थ्यांची नोंदणी पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावेळी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी वीज पोहचू शकत नाही. विजेच्या तारा व खांब पोहचू शकत नाही अशा ठिकाणी सौर कृषि पंप देण्याची योजना शासनाची असून या योजनेस मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत राज्यात १ लाख कृषि पंप देण्याचे नियोजन आहे. या योजनेत ५ व ३ एपी चा डिसी पंप देण्यात येतो. या पंपाची मूळ किंमत ३ लाख ८५ हजार व २ लाख ५५ हजार आहे. मात्र शासन सबसिडीवर हे पंप सर्वसाधारण प्रवर्गास अनुक्रमे ३८ हजार ५०० व २५ हजार ५०० तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गास अनुक्रमे १८ हजार २५० व १२ हजार ५५० रुपयात सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार चरण वाघमारे यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result