महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘मेडा’ कार्यालयाचे उद्घाटन सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९


यवतमाळ : यवतमाळ व वाशिम या दोन जिल्ह्यांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (मेडा) कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, जिल्हा व्यवस्थापक दिनेश सुरोसे, व्यवस्थापक विकास दाभाडे, विशेष कार्यकारी अधिकारी विलास चेले उपस्थित होते.

नवीन व नवकरणीय उर्जेच्या क्षेत्रात कार्य करणारे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे कार्यालय यापूर्वी अमरावती येथे होते. आता यवतमाळमध्ये हे कार्यालय धामणगाव रोड येथे जिल्हा न्यायालयासमोर श्रीखंडे ले-आऊट (वॉर्ड क्रमांक ५) येथे कार्यरत झाले आहे.

सर्व नवीन व नवकरणीय ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी, पारेषण, संलग्न / विरहित सौर ऊर्जा प्रकल्प, अटल सौर कृषी पंप योजना आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ऊर्जा विकास अभिकरणाच्या कार्यालयाची आवश्यकता होती. मात्र हे कार्यालय अमरावती येथे असल्यामुळे नागरिक, ग्राहक आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या बाबींची दखल घेऊन नवीन व नवकरणीय ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मेडाचे कार्यालय यवतमाळ येथे मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाला महाऊर्जाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result