महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सांगलीत मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७
सांगली : सामाजिक वनीकरण विभागामार्फत आज सांगली येथे वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून वृक्षदिंडीची सुरूवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध घोषणांनी वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

वृक्षदिंडीच्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विश्वास जवळेकर, सहाय्यक वनसंरक्षक बाबासाहेब पाटील, ए. एम. सामक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनील गोडबोले (निवृत्त) आदि उपस्थित होते.

वृक्षदिंडीची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून सुरु होऊन पुढे विश्रामबाग, मार्केटयार्ड, पुष्पराज चौक मार्गे जिल्हा सैनिक कार्यालय येथे वृक्षदिंडीची सांगता झाली. या वृक्षदिंडीत विविध 12 शाळेतील 518 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी एक मूल एक झाड, झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष लावा मोक्ष मिळवा, साथ देऊया निसर्गाला, नष्ट करूया प्रदूषणाला, बच्चे कम पेड हजार, इको सिटी सुंदर सिटी आदि पोस्टर्स विद्यार्थ्यांच्या हातात झळकत होते.

वृक्षदिंडीच्या समारोप प्रसंगी महासैनिक दरबार हॉल सांगली येथे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विश्वास जवळेकर यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी मार्गदर्शन करून अधिकाधिक वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले. पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांनी उपस्थित सर्वांना पर्यावरण प्रतिज्ञा देऊन सांगली जिल्ह्यामध्ये ही 29 वी वृक्षदिंडी असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना पाणी, वीज बचतीचे व वृक्षलागवडीचे महत्व सांगितले.


'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result