महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पत्रकारांनी शासकिय योजनेबाबत सकारात्मक लिखाण करुन पुरस्कार योजनेत सामिल व्हावे - मनिषा सावळे गुरुवार, १६ मार्च, २०१७
वर्धा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम, जलयुक्त शिवार, स्वच्छता अभियान यासारख्या योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रातून सकारात्मक लिखाण करावे व शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजनेत सामिल व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी पत्रकार कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.

जिल्हा माहिती कार्यालय व वर्धा जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे वतीने नुकतीच सामाजिक न्याय भवन सभागृह येथे पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन शेतीतज्ज्ञ जयंतराव साळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया, वंदनाताई जावंधिया, वर्धा जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, डॉ. राजेंद्र मुंढे, ज्येष्ठ पत्रकार आनंद शुक्ला, प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य शासनाच्या वतीने शासकिय योजनांची उत्कृष्ट मांडणी स्वरुपात लिखाण करणाऱ्या पत्रकार, संपादक, वार्ताहर, ई-माध्यम प्रतिनिधी तसेच छायाचित्रकार यांना विविध पुरस्कार देण्याची योजना आहे. यामध्ये महात्मा गांधी तंटा मुक्त गाव मोहिमे योजनेची प्रसिद्धीसाठी महात्मा गांधी तंटा मुक्त गाव पुरस्कार, जलयुक्त शिवार मोहिमेची जनजागृतीपर लिखानासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार तसेच विविध योजना आणि सकारात्मक लिखानासाठी राज्यस्तरीय व विभागस्तरावर पुरस्कार दिले जातात. यामध्ये बाळशास्त्री जांभेकर, अनंत गोपाळ शेवडे, बाबुराव विष्णु् पराडकर, मौलाना आझाद, यशवंतराव चव्हाण, पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती, ग.त्र्य. मांडखोलकर असे विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कासाठी जिल्ह्यातून प्रवेशिका सादर करण्याचे प्रमाण नगन्य आहे. यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावे.

जिल्ह्यातील पाचवेळा महात्मा गांधी तंटा मुक्त गाव मोहिम पुरस्कार प्राप्त पुण्यनगरी संपादक प्रवीण होणाडे यांनी पुरस्काराबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी शेतकरी नेते विजय जांवधिया वर्धा येथून नागपूर येथे स्थानांतरीत झाल्यावबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण धोपटे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रवीण वानखेडे व आभार प्रफुल व्यांस यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result