महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा म्हणून संबंधित शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकार गुरुवार, २५ एप्रिल, २०१९खरीप हंगाम सन
2019-20 साठी 1 लाख क्विंटल बियाणे, तर 77 हजार मेट्रीक टन खताची मागणी 


लातूर
:
भारतीय हवामान विभागाने सन 2019-20 या वर्षांत पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असेल असे सांगितले आहे. तसेच मराठावाडा विभागासाठी मान्सून हा जुगारच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित सर्व शासकीय यंत्रणेने प्रत्ये‍क शेतकऱ्याला कृषी व इतर अनुषंगिक योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. यापुढील काळात जिल्ह्यात एक ही शेतकरी आत्महत्या होणार नाही याकरिता प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक काम करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

जिहाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सन 2019-20 खरीप हंगापूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, कृषी सहसंचालक टी.एन.जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा कृषी विकास अधिकारी भिमदेव रणदिवे,आत्माचे प्रकल्प संचालक दिनकर जाधव, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शंकर बुरडे, जिल्हा उपनिबंधक आमृत जाधव, कृषी उपसंचालक व्ही.बी.सरोदे, उपविभागीय कृषी अिधिकारी राजकुमार मोरे यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, सर्व यंत्रणांनी शेतकऱ्यांना यावर्षीच्या सर्वसाधारण पावसाची माहिती देऊन ज्या भागात ऊसाचे क्षेत्र अधिक आहे त्या भागातील शेतकऱ्यांना पर्यायी पीकांची माहिती देऊन त्याबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे. तर प्रत्येक  शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या आरोग्याची पत्रिका तयार करून त्यानुसार खताची मात्रा देण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मान्सून हा एक जुगार असल्याने येथील शेतकऱ्यांना संबंधित यंत्रणांनी हवामान, पीक पद्धती, खत वापर, बियाणे आदिबाबत योग्य व सकारात्क माहिती देण्याचे काम प्रामाणिकपणे करावे. त्यामुळे पुढील काळात एक ही शेतकरी आत्महत्या सारखं पाऊल उचलणार नाही,असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. 

पिक विमा बाबत शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. परंतु त्याच प्रमाणात फळपीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये आवश्यक तेवढी जागृती झालेले दिसून येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने फळ पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये  विमा भरण्याबाबत अधिक जागृती करावी असे, आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले प्रत्येक गावातील शेतजमिनीचे आरोग्य पत्रिका तयार करून त्या आरोग्य पत्रिकेनुसार त्या गावात खताचा पुरवठा करावा याबाबत संबंधित खतांचे डीलर्स किरकोळ विक्रेते यांना सूचना द्याव्यात तसेच याबाबत डीलर्स व विक्रेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

खरीप हंगाम सन 2019-20 ज्वारी, बाजरी, मका इतर धान्य, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल सोयाबीन, भुईमूग, कापूस, भात आदी पिकांच्या 1 लाख 8 हजार 483 क्विंटल बियाण्याची मागणी नोंदवली असून युरिया, डीएपी, एस पी एस, डी ओ पी व इतर संयुक्त खते यांचे 77 हजार 220 मेट्रिक टनाचे आवंटन मागणी केलेली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.आळसे यांनी दिली. लातूर जिल्ह्यात 953 बियाणे, 912 खते व 711 किटकनाशकाची विक्री केंद्र आहेत. बिायाणे व खते विक्रीत गैरप्रकार होऊ नये व कोणत्यही वाणांची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा, उपविभाग व तालुका पातळीवर फिरते पथक स्थापन करून निविष्ठाची उपलब्धता त्याची गुणवत्ता व किमती यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पथकामार्फत करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आपत्कालीन पिक योजनेत बियाणे गरज, खरीप पत पुरवठा, फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री  पिक विमा योजना, सिंचन नियोजन, राष्ट्रीय अन्न योजना, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेतीशाळा आदिंचा सविस्तर आढावा घेऊन सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने  प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन  केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result