महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसहभागातून झालेल्या कामामुळे 3 लाख द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण - महादेव जानकर मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
वर्धा : पाणी फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील 52 गावातील नागरिकांनी नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, मातीनाला बांध, विहिर दुरुस्ती अशा विविध स्वयंस्फुर्तीने लोकसहभागातून केलेल्या कामामुळे 3 लाख दक्ष लक्ष घन मीटर पाणीसाठा निर्माण झाला ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. गावकऱ्यांनी लोकसहभागातून केलेल्या कामामुळे कार्याची दखल घेऊन काकडदरा या गावाला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यातून 50 लाख रुपयाचे पहिले बक्षिस प्राप्त झाले आहे. यासाठी काकडदरावासियांचे महादेव जानकर यांनी अभिनंदन करुन पूढेही असेच लोकसहभाग वाढवावा, असे महादेव जानकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या मुख्‌य शासकिय ध्वजारोहन प्रसंगी शुभेच्छा देताना व्यक्त केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात आयोजित मुख्य ध्वजारोहन कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. ,उपस्थित होते.

जिल्ह्यात मागील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 571 गावांमध्ये विविध विभागांनी घेतलेल्या उपचराऱ्याच्या कामामुळे 40 हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. शिवाय कमलनयन बजाज फाउंडेशन यांच्या सहकार्याने यशोदा नदी पुनर्जीवन विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये 630 किलोमीटरचे नदी - नाले खोलीकरण व उपचाराची कामे करण्यात येत आहेत. आर्वी, वर्धा, देवळी हिंगणघाट तालुक्यातील 143 गावे या प्रकल्पात समाविष्ट आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील 27 हजार 989 शेतकरी कुटुंबाना होणार असून 2 लाख 5 हजार 438 एकर जमिनीला संरक्षित सिंचन होणार आहे. असे महादेव जानकर म्हणाले. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्तृ करुन राज्यात पहिला क्रमांक पटकविल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

शासनाने नुकतीच कर्जमाफी जाहिर केलेली असून जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मंडळस्तरावर घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये 20 हजार शेतकऱ्यांना 225 कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 90 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे, असे महादेव जानकर म्हणाले.

यावेळी मंत्रीमहोदयाचे हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आपला जिल्हा वर्धा व मुद्रा योजना पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस विभागाच्या पोलीस अधिकारी , कर्मचारी, यांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त गावांचा सरपंच व सचिव व वनमहोत्सवात 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग नोंदविल्याबद्दल सामाजिक संस्था, व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result