महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणी बचतीचा संदेश देत ठाण्यातल्या जलदौडीमध्ये शेकडो विद्यार्थी उत्साहाने धावले सोमवार, २० मार्च, २०१७
पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

ठाणे :
जिल्ह्यात सध्या जलसंपदा विभागातर्फे जलजागृती सप्ताह सुरु असून आज सकाळी खेवरा सर्कल येथून प्रारंभ झालेल्या जलदौडीत शाळा - महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेनंतर काशिनाथ घाणेकर सभागृहात विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या जलदौडीस झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मनपा उपायुक्त सुनील चव्हाण, कोकण पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, श्रीमती अन्सारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.

आज सकाळी खेवरा सर्कल येथून या ३ किमी दौडीस सुरुवात झाली. हिरानंदानी मेडोज-तुळशीधाम-पोखरण रोड नं.2-गांधी चौक या मार्गाने ही दौड काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे समाप्त झाली. कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार व उप कार्यकारी अभियंता हेंमत कुलकर्णी यांनी या जलदौडीच्या आयोजनात परिश्रम घेतले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी आणि नागरिक यांच्या हातात पाणी बचतीचा संदेश देणारे विविध फलक होते तर टी शर्टसही घोषवाक्यांनी रंगविलेले होते. या दौडीमधल्या विजेत्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या दौडीत विजेते खालीलप्रमाणे आहेत.

१५ वर्षाखालील – अशोक वारगुडे (प्रथम), अशोक जाधव (द्वितीय), अमोल उदुगडे (तृतीय) १५ वर्षावरील मुली – गीता राठोड (प्रथम), आकांक्षा ओंबळे (द्वितीय), उर्मिला पवार (तृतीय) १५ वर्षावरील मुले – स्वप्नील देवरुखकर (प्रथम), दिवेश यादव( द्वितीय), फरमान खान (तृतीय).
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result