महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७
ठाणे : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुख्य निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे निरीक्षक आपापल्या क्षेत्राला भेटी देऊन पूर्वतयारीचा आढावाही घेणार आहेत.

पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर (भ्रमणध्वनी क्र. ९९३०९९८९६९) यांच्याकडे अंबरनाथ क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. मुंबई उपनगरच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे (भ्रमणध्वनी क्र. ८६५२७१००२२) यांच्याकडे कल्याण मुरबाड क्षेत्र तर अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमणे/निष्कासन) पूर्व उपनगरे विवेक गायकवाड (भ्रमणध्वनी क्र.९८५०३५५९९८) यांच्याकडे भिवंडी शहापूरची जबाबदारी दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर
याशिवाय पंचायत समितीसाठी खालीप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारीही राहतील.
शहापूर १ जयराम पवार (भ्रमणध्वनी क्र. ९८६०४२११११)
शहापूर २ संदीप पवार (भ्रमणध्वनी क्र. ८४२२९१३३९५)
मुरबाड प्रसाद उकर्डे (भ्रमणध्वनी क्र. ९४०३५१११११)
कल्याण धनाजी तोरसकर (भ्रमणध्वनी क्र. ९८५०००००६५)
भिवंडी १ शिवाजी पाटील (भ्रमणध्वनी क्र. ७०४५४४५५२२)
भिवंडी २ संतोष थिटे (भ्रमणध्वनी क्र. ८८८८८८९००८)
जगतसिंग गिरासे (भ्रमणध्वनी क्र. ९८९०४५११६६)

तक्रार निवारण कक्ष
ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्हा तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे,पहिला मजला येथे स्थापन करण्यात आलेला असून ०२२-२५३०१७४० हा दूरध्वनी क्रमांक आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result