महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकप्रतिनिधी व प्रशासन विकासाची दोन चाके- रवींद्र चव्हाण रविवार, ०३ मार्च, २०१९पनवेल येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

अलिबाग : शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचण्यासाठी विकासाच्या रथाची दोन्ही चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम केले, तरच फायदा होतो. याचा प्रत्यय पनवेलच्या नागरिकांना येत आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केले.

पालकमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते पनवेल मनपा हद्दीतील ९६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटीलसभागृह नेते परेश ठाकूर, वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, राजू सोनी, सभापती लीना गरड, नगरसेविका चारुशीला घरत, मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, पं. स. सदस्या रत्नाताई घरत, जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ  आणि नगरसेवक उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी नवीन मराठी शाळेच्या बांधकामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापौर आणि नगरसेवकांचे कौतुक केले. या शाळेच्या पाठिशी शासन उभे राहील. याबरोबरच महापालिकेत आलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळाही वर्ग करून घ्याव्यात, अशी सूचना केली.

श्री. ठाकूर यांनी पालकमंत्र्यांचा आदर्श घेऊन काम करताना विकास होत आहे. तीन महिन्यांत १०० कोटीपेक्षा जास्त कामे करण्यात येत आहेत, असे सांगितले.

श्री.चव्हाण यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिका हद्दीतील गावामध्ये स्ट्रीट लाईटचे पोल उभारणे, वडाळे तलावाचे सुशोभिकरण, नॅशनल पॅराडाईज सोसायटी ते गोदरेज स्काय गार्डन ते अ.भू.क्र.399 व राष्ट्रीय महामार्ग क्र.04(अ.भू.क्र.307) ते पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत रस्त्याच्या काँक्रीटीकरण, प्रॉ.क्र.1033-अ येथे समाज मंदिर बांधकामाचे भूमीपूजन, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण, प्राथमिक मराठी कन्या शाळेच्या बांधकाम आदी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result