महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान; जिल्हाधिकाऱ्यांकडून मेळघाटातील प्रकल्पांची पाहणी रविवार, ०२ जून, २०१९


अमरावती : महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानाद्वारे मेळघाटातील विविध गावात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी पाहणी केली.

जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी धारणी तालुक्यातील बोड, बेदरबल्ला, भूलोरी आदी गावांना भेट दिली. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानाद्वारे या गावात परसातील कुक्कुट पालन, ग्राम उद्योग केंद्र, महिला बचत गट, जलसंधारण आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांची पाहणी श्री. नवाल यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेची कामे अधिक गतीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

भूलोरी येथील आगीच्या दुर्घटनेत नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. नागरिकांकडून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result