महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्हा कृषि महोत्सव व दख्खन जत्रा महोत्सवाचे उद्घाटन रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८
पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली :
इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषि महोत्सव आणि दख्खन जत्रा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन आज कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने उपस्थित होते.

पोलीस कवायत मैदान इस्लामपूर येथे कृषि आणि दख्खन जत्रा महोत्सव दि. 11 ते 15 फेब्रुवारी 2018 या कालावधीत होत आहे. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या विद्यमाने जिल्हा कृषि महोत्सव आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे दख्खन जत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषी महोत्सवात 200 पेक्षा अधिक आणि दख्खन जत्रा महोत्सवामध्ये जवळपास 125 स्टॉल लावले आहेत. यामध्ये बचत गट निर्मित खाद्यपदार्थ व विविध वस्तू तर कृषी महोत्सवात ट्रॅक्टर व अवजारे, प्रक्रिया उद्योग, कृषीविषयक उपक्रम, खादी ग्रामोद्योग, सूक्ष्म सिंचन व खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व हरितगृह उभारणी, बियाणे व कीटकनाशके, गृहोपयोगी वस्तूंचे, धान्य महोत्सव यासह विविध विभागांचे त्यांच्याकडील असणाऱ्या योजनांबाबत स्टॉल लावण्यात आले आहेत.

या स्टॉलना भेटी देण्यासाठी नागरिक गर्दी करत असून प्रत्येक स्टॉलवर पुरूष व महिला यांची गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या कृषि महोत्सव आणि दख्खन जत्रा महोत्सवास भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result