महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
संत कुलभूषण नगद नारायण यांच्या समाधीचे मुख्यमंत्री यांनी घेतले दर्शन, विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८
बीड : श्री क्षेत्र नारायण गडावरील संत कुलभूषण नगद नारायण यांच्या समाधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन गडाची पाहणी केली. तसेच श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानाच्या विविध विकास कामांसाठी मंजूर केलेल्या 25 कोटी निधीअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमध्ये मंदीर परिसरात दगडी फरशी बांधकाम, पाण्याची टाकी, पाईप लाईन व उपांग दुरुस्तींची कामे, सिमेंट काँक्रिट वाहनतळ, बस स्टॅण्ड, भक्तनिवास, सांस्कृतिक सभागृह, दोन प्रसादालय, दर्शनाची व्यवस्था, पालीस मदत केंद्र, डिजिटल लॉकर आदी विविध कामांचा समावेश आहे.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज, आमदार सर्वश्री विनायक मेटे, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result