महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
२३ मे साठी रायगड जिल्हा निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी शनिवार, ११ मे, २०१९

मत मोजणीच्या एकूण १५६ फेऱ्या होणार लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न – डॉ. विजय सूर्यवंशी

रायगड- अलिबाग : लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी अलिबाग जवळील जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे होणार असून निवडणूक यंत्रणा जय्यत तयारीत असून लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

प्रत्येक मत मोजणीसाठी १४ टेबल्स

 विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या प्रत्येक मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार एकुण लोकसभा मतदार संघाच्या १५६ फेऱ्या होणार आहेत. त्यात सर्वाधिक फेऱ्या २८ महाड आणि सर्वात कमी फेऱ्या २३ गुहागर या विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत. ३२ रायगड लोकसभा तदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशी एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये  एकू १६,५१,५६० मतदारांपैकी १०,२०,१४० मतदारांनी मतदान केले आहे. एकुण ६१.७६ टक्के मतदान झालेले आहे. त्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

विधानसभा मतदार संघ

मतदान केंद्र संख्या

फेऱ्या

झालेले मतदान

191 पेण

375

27

195567

192 अलिबाग

377

27

189713

193 श्रीवर्धन

351

25

152664

194 महाड

392

28

168580

263 दापोली

363

26

171907

264 गुहागर

321

23

141709

एकुण

2179

156

1020140

 

अशी होणार मत  मोजणी

मतमोजणी ठीक सकाळी  वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील ८४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत. 

३२ रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकू १४०५ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकूण ९३९९ असे एकुण १०८०४ मतदार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत अनुक्रमे ७५५ व ४८०५ असे एकुण ५५६०  मते प्राप्त झालेली आहेत सर्व प्रथम या मतपत्रिकांची  मतमोजणी केली जाणार आहे.

क्रीडा संकुल येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या
  व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.

प्रशिक्षण वेगात

सर्व मतदारसंघाची टेबल व फेरीनिहाय मतमोजणी, पोस्टल बॅलेट व ईटीपीबीएस यांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक  अधिकारी/कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. सदर मतमोजणी अधिकारी/कर्मचारी यांना ३० एप्रिल रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात आलेले असून शनिवार १८ मे रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे तसेच मतामोजणीची रंगीत तालिम दिनांक २२ मे रोजी जिल्हा क्रडा संकुल नेहुली येथे घेण्यात येणार आहे. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result