महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र वार्षिकी 2018 पुस्तकाचे प्रकाशन रविवार, ०३ जून, २०१८
सांगली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित महाराष्ट्र वार्षिकी 2018 चे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि उपस्थित होते.

महाराष्ट्र वार्षिकी या पुस्तकाचे संदर्भ मूल्य मोठे आहे. हे एक उत्तम संदर्भ पुस्तक असून, प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांच्या संग्रही असावा अशी प्रतिक्रीया पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र वार्षिकी या पुस्तकात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती अद्ययावत आकडेवारीसह देण्यात आली आहे. या पुस्तकाची किंमत 250 रूपये आहे. हे पुस्तक जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2602059 येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result