महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण बुधवार, ०१ मे, २०१९


नवी मुंबई :
महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना श्रीमती विद्या ठाकूर यांनी यावेळी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन., पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.संजय कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक, सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट ब्रुफ वाहन, आर.आय.व्ही. वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरूण वाहन, अग्निशमन दल वाहन, आदींनी संचलनाव्दारे प्रमुख अतिथी श्रीमती विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या कार्यक्रमास उपआयुक्त (सामान्य प्रशासन) अनंत दहिफळे, उपायुक्त (आस्थापना) गणेश चौधरी, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण, उपायुक्त (नियोजन) श्री. बी.एन. सबनीस, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभांगी पाटील आणि निंबाजी गिते यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result