महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आज मतदान सोमवार, २२ एप्रिल, २०१९रत्नागिरी : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत उद्या दिनांक 23 एप्रिल 2019, मंगळवार रोजी 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यात अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवून मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

उद्या सकाळी
07.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून आज सर्व मतदान केंद्रांसाठीचे कर्मचारी रवाना झाले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. रत्नागिरी विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांसाठी येथील कुवारबाव मधील आंबेडकर भवन येथून सर्व कर्मचारी रवाना झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


सार्वजनिक सुट्टी

निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे यासाठी 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार 23 एप्रिल2019 रोजी ही सुट्टी या मतदार संघासोबत 32 रायगड लोकसभा मतदार संघातही असेल.


ही सुट्टी पराक्राम्य संलेख अधिनियम
1881 चा 26 च्या कलम 25 नुसार जाहीर करण्यात आलेली असल्याने ही सुट्टीची अधिसूचना राज्य व केंद्र शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि इतरसर्व प्रतिष्ठानांना लागू असेल. उपरोक्त सुटी मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या- त्या मतदार संघाबाहेर असतील त्यांनाही ही सुटी लागू असेल असे शासनाचे उपसचिव सं. कृ. भोसले यांनी 27 मार्च  2019  रोजी प्रसिध्द राजपत्राद्वारे घोषित केले आहे, अशी माहिती अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळविले आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result