महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोकण भवन येथे काळ जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत बैठक संपन्न मंगळवार, १८ एप्रिल, २०१७
नवी मुंबई : कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज काळ जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन व भूसंपादनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, उपायुक्त (पुनर्वसन) अरुण अभंग आदी उपस्थित होते.

या बैठकीत श्री. देशमुख यांनी काळ जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना पुनर्वसनाच्या सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे प्रगतीपथावर असून प्रकल्पग्रस्तांना सर्व कायदेशीर लाभ मिळणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, महाड, माणगांव, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (काळ प्रकल्प) तसेच जलविद्युत प्रकल्प पुनर्वसन समिती सदस्य उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result